सनी लिओन फिटनेसच्या बाबतीत जरा जास्तच जागरूक आहे. आता लॉकडाऊनमध्ये तिने आपल्या वर्कआऊटची व्याप्ती आणखीन वाढवली आहे. आता तिने आपल्या व्यायामाची व्याख्याच बदलून टाकली आहे. तिने अलीकडेच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये ती 10 किलो वजन असलेला शर्ट घालून व्यायाम करताना दिसते आहे. आपल्या लहान मुलाला स्ट्रॉलरमध्ये ठेवून ती जॉगिंग करताना या इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये दिसते आहे.
“एकतर हा वजनदार शर्ट आणि त्यात स्ट्रॉलर ढकलत जॉगिंग करण्याचा अनुभव खरेच खूप वजनदार होता. लॉकडाऊन लाईफ’ असे सनीने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. लॉकडाऊनमध्ये सनी आपल्या मुलाची काळजी करते आहे. शनिवारी तिने आपल्या तिन्ही मुलांचा असाच एक मस्त फोटो शेअर केला आहे. “सर्व मातांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा’ असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
आपली मुले हीच आपली प्राथमिकता असते. करोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून मुले जिथे सुरक्षित राहू शकतील, अशा ठिकाणी त्यांना घेऊन जाण्यात मी आणि डॅनिएल यशस्वी झालो. मातृदिनाच्या दिवशी आपल्या आईची खूप आठवण येत असल्याचेही सनीने म्हटले आहे.