विशेष मुलांसाठी सनी लिओनने एक उपक्रम आयोजित केला आहे. या विशेष मुलांसाठी तिने डे आऊटचे आयोजन केले आहे. सनी आणि तिचा पती डॅनिएल वेबर यांनी नुकतेच जुहूमध्ये किड्स सोशल हाऊस सुरू केले आहे. या शाळेमध्ये प्रत्येक वयाच्या मुलांसाठी आर्ट सेक्शन आहे.
याशिवाय खेळाची विविध साधने आणि विशेष सुविधाही आहेत. विशेष मुलांसाठी डे आऊटचे आयोजन करण्याची आयडिया सनीला तिच्या मित्राने सुचवली. हस्तकला, चित्रकला आणि अन्य अनेक कलात्मक गोष्टी इथे मुलांना शिकवल्या जाणार आहेत. हा आनंद मुलांना दीर्घकाळ स्मरणात राहिल, असे सनीचे म्हणणे आहे. सनीने विशेष मुलांसाठीच्या या डे आऊटसाठी बेबीज कॅसल या विशेष मुलांच्या शाळेबरोबर सहकार्य केले आहे.
या शाळेतील 15-20 विशेष मुले सनीच्या किड्स सोशल हाऊसमध्ये जातील आणि दिवसभर मौजमस्ती करतील, अशी कल्पना आहे. सनी सध्या एका कॉमेडी वेबसिरीजमध्ये काम करायला सुरुवात केली आहे.
यातूनही तिने एक सामाजिक उद्देश साध्य केला आहे. या वेबसिरीजचे मानधन ती अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या सेंट कॅथरिन होम या स्वयंसेवी संस्थेला दान करणार आहे. याच संस्थेतून सनी आणि डॅनिएलने आपली पहिली मुलगी निशाला दत्तक घेतले आहे.