मुंंबई – अभिनेत्री सनी लिओन तिच्या हॉट आणि बोल्ड लुकमुळे अधिक चर्चेत असते. अनेक हिंदी चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. मात्र सध्या सनी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. एका मुलाखतीमध्ये तिने मुंबईतील पावसामुळे तिला खूप त्रास सहन करावा लागल्याचा अनुभव सांगितला आहे. इतकेच काय तर पावसामुळे तिचे करोडोंचे नुकसानही झाले होते.
मुंबईत आलेल्या पावसाच्या अनुभवाबाबत सनी लिओन म्हणाली की, “मला पाऊस खूप आवडतो, पण जोपर्यंत मी घरात आहे तोपर्यंतच… मी मुंबईत समुद्राजवळ राहत होते. पावसाळ्यात तिथल्या भिंतीवरून पाणी टपकत असायचे, त्यामुळे माझ्या वस्तू खराब होत असायच्या. याशिवाय पावसामुळे माझ्या तीन गाड्या खराब झाल्या होत्या. त्यापैकी दोन वाहने वाहून गेली, त्यातील एक मर्सिडीज होती. पावसात माझ्या महागड्या कार गमावल्यानंतर मला खूप दुःख झाले आणि मी खूप रडली होते. कारण जर तुम्ही परदेशातून भारतात निर्यात केलेल्या कार खरेदी केल्या तर तुम्हाला त्यावर भरपूर कर भरावा लागतो.”
पुढे ती म्हणाली, “पण आता मला मुंबईच्या हवामानाबाबत चांगलेच लक्षात आले आहे. मला हे देखील समजले की वस्तू हरवण्यापेक्षा किंवा खराब होण्यापेक्षा कोणालाही दुखापत न होणे जास्त महत्वाचे असते. आता मी पूर्वीपेक्षा हुशार झाली आहे. यासोबतच मी मेड इन इंडिया ट्रकही खरेदी केला आहे. जी पावसापासून बचावासाठी तयार केली आहे.”