पुणे : कोथरूड भागात एका महाविद्याालयीन तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. त्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सूर्यकांत सुभाष बामणे (वय २४, रा. शिल्पा सोसायटी, एमआयटी महाविद्याालय रस्ता, कोथरूड) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. सूर्यकांत कला शाखेत शिक्षण घेत होता. सूर्यकांतचे वडील सातारा परिसरातील एका अभियांत्रिकी महाविद्याालयात प्राध्यापक आहेत. त्याची आई शिक्षिका आहे.
बामणे कुटुंबीय कोथरूड भागात वास्तव्यास आहेत. ते राहत असलेल्या इमारतीचा पुनर्विकास करण्यात येत असल्याने गेल्या दिवसांपासून ते शिल्पा सोसायटीत भाडेतत्त्वावर सदनिका घेऊन राहत आहेत.