मुंबई – ‘पुष्पाः द राईज’ सिनेमा प्रदर्शित झाल्यांतर दाक्षिणात्य अभिनेत्री ‘रश्मिका मंदाना’ लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. सध्या सर्वत्र याच सिनेमाचा बोलबाला असून, सिनेमातील डायलॉग आणि गाणी प्रचंड गाजत आहेत. पुष्पा मध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार ‘अल्लू अर्जुन’ आणि अभिनेत्री ‘रश्मिका मंदाना’ यांची जोडी प्रेक्षकांना चांगली भावली आहे.
रश्मिका हे नाव कलाक्षेत्रात रुची असलेल्यांसाठी सर्वपरिचत आहे. तिचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. त्यामुळेच रश्मिका टॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. 2020 मध्ये गुगलबाबाने रश्मिका मंदाना नॅशनल क्रश असल्याचं जाहीर केलं होत.
2016 मध्ये कलाविश्वात सक्रीय झालेल्या रश्मिकाने ‘किरिक पार्टी’ या कन्नड सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर तिचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. रश्मिका एका सिनेमासाठी तब्बल 3 ते 4 कोटी रुपये मानधन घेते. त्यामुळे तिचं नेटवर्थ $400 मिलिअन असल्याचं सांगण्यात येतं.
View this post on Instagram
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या रश्मिकाने नुकतंच आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिने ऑफ व्हाईट रंगाची ऑर्गेन्झा साडी नेसली असून, या साडीला रॉ सिल्कची बॉर्डर असून काठांवर हँड एम्ब्रॉयडरी केली आहे. साडीच्या पदरावर पूर्णपणे फुलांचे डिझाईन आहे. या साडीवर मोतीया रंगाचे स्लिव्हलेस ब्लाऊज घातले आहे.
हैदराबादमध्ये ‘पुष्पा’ सिनेमाचे प्रमोशन कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात रश्मिका ही साडी नेसून सहभागी झाली होती. रश्मिकाने नेसलेली ही साडी अंकिता जैन हिने डिझाईन केली आहे. अंकिता हॅंडक्राफ्टेड ऑफ व्हाईट ऑर्गेन्झा साडी डिझायनर म्हणून ओळखली जाते. या साडीची किंमत ही 31 हजार 500 रुपये आहे. या साडीत रश्मिका प्रचंड मादक दिसून असून, फॅन्सने तिच्या फोटोंवर लाईक्स अँड कमेंटचा वर्षाव केला आहे.