बिहारमधील बक्सरमध्ये ध्वजारोहण सुरू असताना मोठी दुर्घटना घडली आहे. विजेच्या धक्क्याने एका मुलाचा मृत्यू झाला, तर अन्य् चार मुले गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बक्सरच्या नथुपूर प्राथमिक शाळेत मोठा अपघात झाला ध्वजारोहण करताना शाळकरी मुले करंटच्या तडाख्यात आली, त्यात एका मुलाचा मृत्यू झाला, तर 4 मुले गंभीर जखमी झाली. जखमींवर बक्सर सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती देताना मुलांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, मुले ध्वजारोहण करण्यासाठी शाळेत पोहोचली होती. त्यानंतर तिरंगा असलेल्या पाईपमध्ये करंट आला. ज्याचा कचाट्यात शाळकरी मुले आली. रुग्णालयात दाखल केलेल्या या मुलांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे, तर इतर मुलांवर उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, मुलांचे कुटुंबीय आक्रोश करत आहेत. स्थानिक प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून मुलांवर योग्य उपचार करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. याशिवाय या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जात आहे की, पाईपमध्ये करंट कसा आला?