नवी दिल्ली : आंतराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधानांनी आज दिवसभरासाठी आपल्या ट्विट खात्यावरुन रजा घेतली आणि आज दिवसभर नारी शक्ती सन्मानप्राप्त सात यशस्विनी या ट्विटर खात्यावरुन स्वतःच्या आयुष्याच्या प्रवासाचा आलेख मांडला.
तसेच पंतप्रधानांच्या समाजमाध्यम खात्यांवरुन या यशस्वी महिलांनी जनतेशी संवाद साधला. देशाच्या सर्वच कानाकोपऱ्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या यशस्वी महिलांची संख्या मोठी असून त्यांनी अत्यंत वैविधघ्यपूर्ण अशा क्षेत्रांमध्ये महान कार्य केले आहे.
या महिलांचे संघर्ष आणि महत्त्वाकांक्षा यांमधून लाखोंना प्रेरणा मिळत आहे, असे मोदी म्हणाले. अशा महिलांचे यश सातत्याने साजरे करुन त्यापासून शिकवण मिळवावी असे आवाहन त्यांनी देशवासियांना केले आहे.
पंतप्रधानांच्या ट्विटर खात्यावरुन स्वतःचा जीवनप्रवासाची हकिकत प्रसारित करताना नारी शक्ती पुरस्कारप्राप्त स्नेहा मोहनदॉस यांनी बेघर लोकांना अन्न देण्याची प्रेरणा आपल्या आईकडून मिळाल्याचे म्हटले आहे.
मोहनदॉस यांनी अन्नबॅंक नावाची चळवळ सुरु केली आहे. देशात आणि परदेशातही भूकमुक्तीसाठी कार्य करणाऱ्या अनेक स्वयंसेवकांसोबत आपण काम केल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यामध्ये पुढे येऊन हातभार लावण्यासाठी देशवासियांना विशेषतः महिलांना प्रेरणा देणाची इच्छा स्नेहा मोहनदॉस यांनी व्यक्त केली.
आपल्या संपूर्ण पृथ्वीला भूकमुक्त करण्यासाठी प्रत्येकाने किमान एका भूकेल्याला अन्न द्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे. दिव्यांगासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्या आणि प्रेरक वक्त्या डॉ.मालविका अय्यर यांनी अंपगत्वा संबंधीच्या दृष्टीकोनात बदल करणे म्हणजेच याबाबतची अर्धी लढाई जिकणे असे म्हटले आहे.
अंपगत्वा विषयीचे दीर्घ काळापासून चालत आलेले गैरसमज दूर होत आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.