ट्रम्प यांच्या मूर्तीला चीनमध्ये जोरदार मागणी

बीजिंग – गेल्या काही काळात अमेरिका आणि चीन यांच्यात सातत्याने खटके उडत असून एकूण तणावाची स्थिती आहे. या संघर्षाची सुरूवात डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष असतानाच झाली होती. त्यांनी चीनवर सातत्याने आरोप केले होते. इतकेच काय त्यांनी करोना हा चीनी व्हायरस असल्याचे जाहीर विधानही अनेक वेळा केले होते. त्यामुळे ट्रम्प अर्थातच चीनच्या अथवा तेथील नागरिकांच्या गुडबुक नसणार असे मानले जात होते. मात्र हा समज खोटा ठरला आहे.

त्याचे कारण असे की, एका चीनी व्यापाऱ्याने बुद्धाप्रमाणे ध्यानस्थ बसलेल्या डोनल्ड ट्रम्प यांच्या मूर्तींची विक्री सुरु केली आहे. आणि त्याला ग्राहकांकडून भरघोस प्रतिसाद मिळतो आहे. ज्योमोशी नावाच्या एका चीनी ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर या मूर्ती विकल्या जात आहेत. हा ग्रुप अलीबाबाच्या मालकीच्या असल्याचे सांगितले जात आहे.

ट्रम्प यांनी निवडणूक काळात केलेल्या मेक युअर अमेरिका ग्रेट अगेन या घोषणेवरून प्रेरणा घेऊन मेक युअर कंपनी ग्रेट अगेन या घोषणेसह या मूर्ती विकल्या जात आहेत. ताओबा नावाच्या व्यक्तीने अश्‍या मूर्ती सिरॅमिक पासून तयार केल्या आहेत. त्यातील छोटी मूर्ती पाच फुट उंचीची तर मोठी फुट 14 उंचीची आहे. त्यांच्या किंमती अनुक्रमे 150 डॉलर्स आणि 610 डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयात 11 हजार आणि 44 हजार आहेत.

या मूर्तीतील ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर अतिशय शांत भाव असून त्यांनी हात मांडीवर ठेवले आहेत. ध्यानस्थ अवस्थेत बसलेल्या ट्रम्प यांच्या केसांची स्टाईल मात्र ओरिजिनल आहे. या मूर्तीसोबत ट्रम्प टॉयलेट ब्रश सुद्धा विक्रीसाठी आणले गेले असून त्यांची किंमत 3 ब्रश साठी दोन डॉलर्स आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.