पुणे – पुणे शहरात येत्या काही दिवसांत मास्क कारवाईचा वेग वाढवू, तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवरही कडक कारवाई करू, असा इशारा महापालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
करोना पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य आहे. मात्र, तरीही काही जण विविध कारणे देत मास्क लावत नाहीत.
दरम्यान, नाकाच्या खाली मास्क असेल तरीही कारवाई करू, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मास्क कारवाईतून आतापर्यंत सुमारे 5 कोटींचा दंड वसूल करण्यात आला असून थुंकणाऱ्यांकडून 2 कोटी वसूल केल्याची माहिती देण्यात आली.