पुणे – दिवाळीनिमित्त शहरात खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता पालिका प्रशासनाने आपल्या बाह्या सरसावल्या आहेत. शहरात सध्या करोनाची स्थिती बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे.
मात्र, सणाच्या काळात करोनाने पुन्हा डोके वर काढू नये व त्याचा फैलाव होऊ नये याकरिता खबरदारी घेतली जाणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
रस्त्यात थुंकणाऱ्यांवर व मास्कविना फिरणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून नियमाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.
दरम्यान, मास्क कारवाईतून आतापर्यंत सुमारे 5 कोटी व थुंकीबहाद्दरांवर केलेल्या कारवाईतून सुमारे दोन कोटींचा दंड वसूल केल्याची माहिती देण्यात आली.