निजामाबाद – तेलंगणातील हैदराबादमध्ये भटक्या कुत्र्यांनी ह एका पाच वर्षांच्या लहान मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना रविवारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पाच वर्षांचा प्रदीप वडिलांसोबत कामावर गेला होता.
#hyderabad dog bite pic.twitter.com/mJkKOnaof3
— Sai vineeth(Journalist🇮🇳) (@SmRtysai) February 21, 2023
मुलाचे वडील सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात आणि त्यांच्या मुलावर कुत्र्यांनी आवारातच हल्ला केला. ही संपूर्ण घटना आवारात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये बालक कॅम्पसमध्ये एकटाच फिरताना दिसत आहे. तेवढ्यात तीन कुत्रे मुलाच्या दिशेने येतात आणि त्याला घेरतात.
घाबरलेल्या मुलाने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला. कुत्र्यांनी आधी त्याचे कपडे ओढले, यादरम्यान मुलानेही स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला खाली पाडले आणि खूप वेळ त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला चावू लागले. यादरम्यान चिमुकला खूप ओरडला या भीषण अपघातात मुलाचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार केलेली नाही.
भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढत आहेत
गुजरातच्या सुरतमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याच्या दोन आठवड्यांनंतर ही घटना उघडकीस आली आहे. याआधी, जानेवारीमध्ये बिहारमधील अराहमध्ये एका भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने 80 हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.