मुंबई – हंसिका मोटवानीने नुकतंच एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये तिने कास्टिंग काऊचबाबत कोणताही वक्तव्य केलं नसल्याचा दावा केला आहे. काही दिवसांपूर्वी हंसिकाने साऊथ इंडस्ट्रीतील कास्टिंग काऊचबाबत केलेलं विधान चांगलाच कॅचर्चेत आलं होत. ज्यामुळे हंसिका सोशल मिडीआयवर ट्रोल देखील झाली होती.
हंसिकाने आपल्या लहान पनापासून अभिनयाला सुरुवात केली.शाका लाका बूम बूम या कार्यक्रमामुळे ती घराघरात पोहचली. साऊथ इंडस्ट्रीमध्ये तिने अनेक बड्या भूमिका देखील साकारल्या आहेत. तर बॉलिवूडमध्ये ती ह्रितिकच्या कोई मिल गयामध्ये दिसली होती. नुकतच हंसिकाला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता अशा बातम्या समोर आल्या होत्या. याच खंडन करत आता हंसिकाने एक ट्विट केलं आहे.
अशा प्रकारच्या बातम्यांबाबत संताप व्यक्त करत हंसिकाने एक स्क्रिनशॉट देखील शेअर केला आहे. ट्विटमध्ये हंसिका म्हणते,”मी असं कुठीही म्हटलेलं नाही. मूर्खपणाने छापणे बंद करा.काहीही छापण्यापूर्वी एकदा फॅक्ट तपासून पहा.”
Publications urging you to cross check before picking up random news piece ! Never made this comment that’s doing the rounds pls fact check before publishing blindly .
— Hansika (@ihansika) May 23, 2023
हंसिका मोटवानी अलीकडेच ‘लव्ह शादी ड्रामा’ या शोमध्ये दिसली होती. या शोमध्ये तिने आपल्या वयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले होते. हा शो हॉटस्टारवर प्रदर्शित झाला होता.