मुंबई – जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश येत असल्यामुळे आणि परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून गुंतवणूक काढून घेत असल्यामुळे बुधवारी शेअर बाजाराचे निर्देशांक एक टक्क्याने कमी झाले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 636 अंकांनी कोसळून 60,657 अंकावर बंद झाला. विस्तारीत पाय असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 189 अंकांनी म्हणजे 1.04 टक्क्यांनी कोसळून 18,042 अंकावर बंद झाला.
सर्वसमावेशक विकासासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढावा – सत्या नडेला
टाटा स्टील, टाटा मोटर्स, विप्रो, पावर ग्रीड, इन्फोसिस, एचडीएफसी बॅंक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी या कंपन्यांच्या शेअरच्या भावात मोठ्या प्रमाणात घट झाली. त्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळले. मात्र अशा परिस्थितीमध्ये मारुती सुझुकी आणि टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस या कंपन्याच्या शेअरच्या भावात थोडेफार वाढ झाली. परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून गुंतवणूक काढून घेत आहेत.
बॅंकर्स समितीकडून अटल निवृत्ती वेतन योजनेबाबत आढावा बैठक
मंगळवारी या गुंतवणूकदारांनी 628 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली, सोमवारी या गुंतवणूकदारांनी शेअरची विक्री केली होती. भारतीय रुपयाचे मूल्य कमी पातळीवर असल्यामुळे या गुंतवणूकदारांना भारतीय शेअर बाजारात केलेली गुंतवणूक परवडत नाही. त्यामुळे ते डॉलर आधारित वित्तीय उत्पादनामध्ये खरेदी करीत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या पतधोरण समितीचे इतिवृत्त बुधवारी उशिरा जाहीर होणार आहे. त्यानंतर जागतिक शेअर बाजारांना काही प्रमाणात दिशा मिळू शकेल असे समजले जाते.