मुंबई – टीव्ही अभिनेत्री जान्हवी किल्लेदार सोशल मीडियावर सक्रिय असते. अनेक फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत ती ‘सानिया’ नावाची भूमिका ती साकारत आहे. नुकतेच या मालिकेची संपूर्ण टीम लोणावळ्यामध्ये पावसाचा आनंद लुटण्यासाठी गेली होती. येथील काही फोटो जान्हवीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावरून तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.
जान्हवीने स्विमिंग पूलमध्ये पावसाचा आनंद घेत असल्याचा एक व्हिडिओ इनस्टाग्रामवर शेअर केला आहे. यात तिने शॉर्ट ड्रेस परिधान केला असून ती फारच हॉट दिसत आहे. तिचा हा लुक काहींच्या पसंतीस पडला. तर काहींनी तिच्यावर टीका केली आहे. जान्हवीने शेअर केलेल्या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले की, “ताई, साडीतच राहा हे नको करु” तर, दुसऱ्याने लिहिले की, “प्लीझ साडीमधले रिल्स शेअर करा” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर दिल्या आहेत.
View this post on Instagram
‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत जान्हवी नेहमीच साडीमध्ये दिसते. मात्र तिचा हा हॉट लुक पाहून चाहते अवाक झाले आहेत. अनेकांनी तिच्या व्हिडिओवर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेतील राजवर्धन मोहिते आणि कावेरी ही जोडी देखील प्रेक्षकांची लाडकी जोडी बनली आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत निवेदिता सराफही मुख्य भूमिकेत आहेत.