बेळगाव : . पाऊस नसल्याने धरणांनी तळ गाठला होता. यामुळे जलाशयांच्या पोटात दडलेल्या बाबी आता समोर येऊ लागल्या आहेत. बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल जलाशय जवळपास कोरडे पडले होते. त्यामुळे धरणात बुडालेले श्री विठ्ठलाचे देखणे भव्य मंदिर पुन्हा भाविकांसाठी खुले झाले.
लांबलेल्या पावसामुळे देवच आला पाण्याबाहेर!
दरम्यान, होन्नुर हुक्केरी येथील तलावातील पाणी आटले होते. त्यामुळे तलाव बांधताना बुडालेले श्री विठ्ठल मंदिर तब्बल 45 वर्षांनी खुले झाले होते. मागील सुमारे महिनाभर इथल्या भाविकांनी विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
पण, आता गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने हे मंदिर पुन्हा पाण्याखाली जाऊ लागले आहे. त्यामुळे भाविकांना हुरहूर लागली असली, तरी जलाशय भरत असल्याचे समाधान आहे.