प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 4 –राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाने केंद्र शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या “राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजने’ला प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शासकीय, निमशासकीय आणि खासगी संस्थांमध्ये शिकाऊ उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.
या ऍप्रेन्टिस योजनेसाठी केंद्र शासनाच्या “ऍप्रेन्टिस इंडिया’ या संकेतस्थळावर नोंदणी करून शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेचा लाभ घेता येणार आहे. “यशस्वी ऍकॅडमी फॉर स्किल्स’ संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी सांगितले. या निर्णयामुळे शिकाऊ उमेदवारांना प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळू शकेल. त्यांना कामाचा अनुभव मिळणार आहे. तसेच या प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात येणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रमाणपत्रामुळे भविष्यातील नोकरीच्या संधी मिळण्यासाठी मदत होणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.