Ujala fabric Whitener M.P. Ravichandran| आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर काही जण यशाच्या शिखरावर पोहचतात. अशाच एका उद्योगपती व्यक्तीची प्रेरणादायी कहाणी आज आपण जाणून घेणार आहोत. एम.पी. रामचंद्रन असे त्यांचे नाव आहे. ते ज्योती लॅबोरेटरीज लिमिटेडचे संस्थापक आहेत. त्यांनी अवघ्या पाच हजार रुपयांची उधारी घेऊन व्यवसाय सुरू केला आणि आज त्यांनी मोठ्या कष्टाने करोडो रुपयांची उभी केली आहे.
अशी केली सुरुवात?
रामचंद्रन यांना नेहमीच शिकण्याची इच्छा होती. काहीतरी वेगळे करण्याचा त्यांचा नेहमी विचार असायचा. पदव्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी अकाउंटंट म्हणून काम करायला सुरुवात केली. मात्र नंतर त्यांनी व्यवसाय करण्याचा विचार केला आणि भावाकडून 5 हजार रुपये उसने घेऊन तात्पुरता कारखाना सुरू केला. आज ज्योती लॅबोरेटरीज ही मल्टी ब्रँड कंपनी बनली आहे. ज्योती लॅबोरेटरीजचे मार्केट कॅप सुमारे 13 हजार 583 कोटी रुपये आहे.
पांढऱ्या कपड्यांसाठी व्हाईटनर बनवण्यासाठी त्यांनी घराच्या स्वयंपाकघरात प्रयोग सुरू केला, पण त्यांना अपयश आले. एके दिवशी त्यांचे लक्ष रसायन उद्योगाच्या एका मासिकावर पडली ज्यामध्ये म्हटले होते की, जांभळ्या रंगाचा वापर कापड उत्पादकांना शक्य तितके पांढरे, चमकदार रंग मिळविण्यात मदत करण्यासाठी केले जाऊ शकतो. यानंतर रामचंद्रन यांनी वर्षभर जांभळ्या रंगांचे प्रयोग सुरू ठेवले. एम.पी. रामचंद्रन यांची कंपनी कपड्यांना सुपर व्हाईटिंगसाठी उजाला नील बनवते.
मुलीच्या नावाने कंपनी सुरू केली
रामचंद्रन यांनी त्यांची मुलगी ज्योती यांच्या नावावर कंपनीचे नाव ज्योती लॅबोरेटरीज ठेवले आहे. पांढऱ्या कपड्यांच्या लोकांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून, लॅबने उजाला सुप्रीम लिक्विड फॅब्रिक व्हाइटनर तयार केले. हे उत्पादन सुरुवातीला 6 महिलांच्या गटाद्वारे घरोघरी विकले गेले. यानंतर लवकरच उजाला सुप्रीमने प्रत्येक भारतीय घराघरात प्रचंड लोकप्रियता मिळवली. ज्योती प्रयोगशाळा सुरुवातीला दक्षिण भारतात वाढल्या आणि 1997 पर्यंत, उत्पादन देशभर प्रसिद्ध झाले. आज उजालाचा राष्ट्रीय स्तरावर लिक्विड फॅब्रिक क्षेत्रात मोठा वाटा आहे. अगदी कमी पैशांमध्ये सुरू केलेल्या रामचंद्रन यांच्या कंपनीचा प्रवास आज मोठ्या उंचीवर जाणून पोहचला आहे.
ज्योती लॅबोरेटरीजची ही आहेत प्रसिद्ध उत्पादने
ज्योती लॅबोरेटरीजची उजाला लिक्विड क्लॉथ व्हाइटनर आणि मॅक्सो मॉस्किटो रिपेलेंट ही दोन उत्पादने प्रसिद्ध आहेत. याशिवाय प्रील डिशवॉश लिक्विड, मिस्टर व्हाईट डिटर्जंट, एक्सो डिश वॉश साबण, मार्गो बॉडी सोप ही ज्योती लॅबोरेटरीजची उत्पादने देखील बाजारात उपलब्ध आहेत.