अशोक पवार ः विद्यार्थी व नागरिकांचा वाचणार बहुमूल्य वेळ
सोरतापवाडी – उरुळी कांचन आणि परिसरातील नागरिक, विद्यार्थी, व्यापारी यांच्यासाठी स्वारगेट-सारसबाग ते उरळीकांचन (ता. हवेली) या बससेवेचा प्रारंभ आमदार ऍड. अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उरुळी काचंन येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले .
ही बससेवा खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि शिरूर-हवेलीचे आमदार ऍड. अशोक पवार यांच्या सहकार्याने, तसेच जिल्हा परिषद सदस्य कीर्ति कांचन यांच्या पाठपुराव्यामुळे सुरू झाली आहे. यावेळी बोलताना आमदार अशोक पवार यांनी सांगितले की ही बससेवा पुन्हा चालू झाल्यामुळे उरुळी कांचन व परिसरातील जनतेला थेट स्वारगेटला पोहचता येणार आहे आणि त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे.
याप्रसंगी यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊरचे माजी चेअरमन के. डी. कांचन, पीएमपीएलचे चेअरमन शंकर पवार, जिल्हा परिषद सदस्य कीर्ति कांचन, पंचायत समिती सदस्य हेमलता बडेकर, उरळीकांचनच्या सरपंच राजश्री वनारसे, उपसरपंच सुनील कांचन, ग्रामपंचायत सदस्य सागर कांचन, राजाराम कांचन, संतोष कांचन, अमित कांचन, अर्जुन कांचन आणि नागरिक उपस्थित होते.