Sports In Pune : रास प्रोजेक्ट कन्सल्टंटस प्रा.लि. तर्फे ‘रास करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ही स्पर्धा २३, २४ व २५ फेब्रुवारी रोजी स्पार्क क्रिकेट अॅकॅडमी, पुनावळे येथे होणार आहे, अशी माहिती रास प्रोजेक्ट कन्सल्टंटसचे व्यवस्थापकीय संचालक अनिल हिंगे यांनी दिली.
स्पर्धेचे हे सातवे वर्ष असून स्पर्धेत ८ निमंत्रित संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेत एकूण २ लाख रूपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. सुरोज बिल्डकॉन इलेव्हन, एसकॉन प्रोजेक्टस् इलेव्हन, एसजे कॉन्ट्रॅक्टस् इलेव्हन, रत्नरुप प्रोजेक्ट्स इलेव्हन, मिलेनियम इंजिनिरर्स अँड काँट्रॅक्टरस इलेव्हन, न्याती इंजिनिअर्स अँड कन्सल्टंटस इलेव्हन, रोहन बिल्डर्स (इंडिया) इलेव्हन, आरकॉन पुणे इलेव्हन या ८ संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे.
हे सामने साखळी आणि बाद फेरी या पध्दतीमध्ये खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन “हॅवमोर आइस क्रीम” समूहाचे व्हाइस प्रेजिडेंट जियॉंगवूक ली, जनरल मॅनेजर धरमवीर कुमार आणि सुरोज बिल्डकॉन चे व्यवस्थापकीय संचालक सचिनजी बियाणी यांच्याहस्ते होणार आहे. गतवर्षी सुर्या इलेव्हन संघाने विजेतेपद तर, मिलेनियम इलेव्हन संघाने उपविजेतेपद मिळवले होते.