पुणे – पीवायसी हिंदू जिमखाना आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या वतीने आयोजित तिसऱ्या एसपी गोसावी मेमोरियल आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत साखळी फेरीत कोर्ट मॅजिशियन,एमडब्लूटीए १, एफसी ब, सोलारिस ईगल्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्टवर सुरूअसलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत कोर्ट मॅजिशियन संघाने टीम योनीराइजचा २४-११असा पराभव केला. कोर्ट मॅजिशियनकडून गिरीश कुकरेजा, सुधाकर रामचंद्रन, परीक्षित तांबे, मनीष टिपणीस, अजिंक्य पाटणकर, शिलादित्य बॅनर्जी, निखिल भगत यांनी सुरेख कामगिरी केली.
दुसऱ्या सामन्यात सुमंत पॉल, गजानन कुलकर्णी,राजेश मंकणी, आशिष मणियार, प्रफुल आशर यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर एमडब्लूटीए १ संघाने एफसी क संघाचा २१-०९ असा पराभव करून शानदार सुरुवात केली. अन्य लढतीत एफसी ब संघाने महाराष्ट्र मंडळ संघाचा २०-१४ असा पराभव करून विजयी सलामी दिली.
सोलारिस ईगल्स संघाने पीवायसी ई संघावर २४-०७ असा विजय मिळवला. सोलारिस ईगल्सकडून संजू घोलप, रवी कात्रे,सिद्धू भरमगोंडे, हेमंत भोसले, निनाद वाणीकर, अन्वित पाठक, रवींद्र पांडे, सिद्धार्थ जोशी यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.