पुणे – १४ वर्षाखालील रिदमिक योगासन क्रीडा प्रकारात ध्रुव ग्लोबल स्कूलच्या महिका पटवर्धन ने चमकदार कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले. ध्रुव ग्लोबल स्कूलचे नाव विभागीयस्तरावर उंचावले आहे. अत्यंत लवचिक आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने रिदमिक योगासन करणारी महिकाने सर्वांचीच मने जिंकली.
तिच्या सादरीकरणाला उत्कृष्ट दाद मिळाली. तीच्या यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यश मालपाणी व प्रिन्सीपल संगीता राऊत यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
अहमदनगर येथील वाडिया पार्क जिल्हा संकुल मध्ये शालेय विभागीय योगासन स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत पूणे विभागातील अनेक शाळांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये वैयक्तिक १४ वर्षाखालील मुलींच्या रिदमिक योगासन क्रीडा प्रकारात ७ व्या वर्गातील महिका पटवर्धनने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन केले.
Khelo India Para Games 2023 : भालाफेक प्रकारात नांदेडच्या भाग्यश्री जाधवला सुवर्णपदक
उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वीही महिका ने अनेक योगासन स्पर्धेत पदके मिळवली आहेत. ही स्पर्धा १४, १७ आणि १९ वयोगटातील मुले व मुलींसाठी होती. प्रशिक्षक गायत्री वारे व वैष्णवी आंद्रे यांनी तिला मार्गदर्शन केले.