वाई – येथील लोकमान्य टिळक ग्रंथालयमध्ये ज्ञानांजन संगीत प्रतिष्ठान महाराष्ट्र व वाई तालुका वारकरी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य संगीत शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात झाला. या शिबिरात वाई तालुका व जिल्ह्यातील ९० हुन अधिक प्रशिक्षणार्थीनी सहभाग घेतला होता.
या शिबिरात मार्गदर्शन करताना ह. भ. प. कैवल्य (आझाद )महाराज गुजर यांनी गायनातील संपूर्ण स्वर मालिकेची ओळख त्यातील मुख्य स्वर सा रे ग म प ध नि सां या सात याची नावे ष ड ज ऋषभ गंधार मध्यम पंचम धैवन निषाद षड्ज नावे त्याच्या व्याख्या आरोह अवरोह व त्यातील शुध्द स्वर मध्ये ७ कोमल ४ त्रिव १ एकूण १२ मालिकेची व स्वरांचा स्वभाव त्याचा नित्यनियमाने खुला सोडणे दाबणे ओढणे करावयाचा ११ मिनिटांचा सराव याची माहिती दिली.
सातारा येथे दरवर्षी संगीत महोत्सव व ज्ञानेश्वर महाराज यांच्या ओवी मंदिराचा, संकल्प व्यक्त केला व ५० विद्यार्थी उपस्थित राहणार असतील तर दर रविवारी वाई शहरात विनामूल्य संगीत प्रशिक्षण शिकवणार, अशी ग्वाही दिली. प्रारंभी सरस्वती मातेचे पूजन माजी नगराध्यक्ष अनिल सावंत, माजी उपसभापती विक्रांत डोंगरे, वाई तालुका वारकरी महासंघाचे अध्यक्ष ह. भ. प. मारुती महाराज चोरट, करणसिह मोहिते, हिंदुराव गोळे, जगन्नाथ शिंदे, रामदास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. समारोपाच्या कार्यक्रमात राजेंद्र शेलार यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. ह. भ. प. प्रशांत महागडे, चैतन्य पाडळे, विशाल गुजर, समीर बुचडे, गणेश गुजर, संदीप गाढवे, विक्रम फणसे, मारुती शिंदे, लक्ष्मण ढवळे, सरस्वती वाशिवले, डॉ. पोतदार, दत्तात्रय कुलकर्णी यांनी शिबीर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.