बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेने कॅन्सरसारख्या रोगाशी दोन हात करीत त्यावर मात केली. पण हा काळ तिच्यासाठी आणि तिच्या कुटुंबीयांसाठी खूपच कठीण काळ होता. 2 वर्षांपूर्वी तिला कॅन्सरसारख्या मोठ्या रोगाने ग्रासले होते. यावेळी सोनाली बऱ्याच भावनिक आणि कठीण काळातून गेली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, न्यूयॉर्कमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. कित्येक महिन्यांच्या उपचारानंतर आणि आत्मविश्वासाच्या बळावर ती बरी झाली होती. आज Cancer Survivors Day असल्यामुळे सोनालीने या दिवसाचे निमित्त साधून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, या कठीण काळाचा संघर्ष सांगितला आहे.
View this post on Instagram
सोनाली बेंद्रेने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर आपला आजारपणाचा आणि आत्ताचा असा एक फोटो शेअर केला आहे. त्यासोबत तिने एक खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, “वेळ कसा उडून जातो. जेव्हा मी मागे वळून बघते, मला माझी ताकत दिसते, मला माझा कमकुवतपणा दिसतो.
View this post on Instagram
मात्र महत्त्वाचे म्हणजे, मला माझी इच्छाशक्ती दिसते. कॅन्सर वॉर्ड ठरवू शकत नाही की माझी लाइफ यानंतर कशी असेल, तुम्हाला जी लाइफ हवी आहे ती तुम्हाला स्वतः क्रिएट करावी लागेल.
View this post on Instagram
आयुष्याचा हा प्रवास तुम्ही कसा कराल हे तुमच्यावर असतं, यामध्ये प्रखर इच्छाशक्ती असणे खूप महत्त्वाचे आहे.’ अशा आशयाची पोस्ट लिहित सोनालीने आपापल्या संघर्षमय काळातील भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.