Ranbir Kapoor – बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या आगामी ‘रामायण’ (Ramayan) चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. नितीश तिवारी यांच्या चित्रपटात रणबीर भगवान श्री रामाची भूमिका साकारताना दिसणार आहे. मात्र, या चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
दरम्यान, रणबीर कपूर या चित्रपटासाठी मोठा त्याग करणार असल्याची बातमी सध्या समोर आली आहे. रामायण चित्रपटाबाबत रोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. अश्यातच आता आणखी एक नवीन बातमी समोर आली असून, रणबीर कपूर चित्रपटासाठी त्याच्या जीवनशैलीत मोठे बदल करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रणबीर कपूरने रामच्या भूमिकेसाठी दारू आणि मांसाहार सोडला आहे. रणबीर चित्रपटाच्या प्रत्येक पैलूमध्ये आपले 100 टक्के योगदान देण्यास तयार असतो.
अभिनेत्याने आपली सार्वजनिक प्रतिमा सुधारण्यासाठी नव्हे तर रामच्या पवित्र पात्राला न्याय देण्यासाठी दारू न पिण्याचा निर्णय घेतला आहे आणि नॉनव्हेज खाणे देखील बंद करणार आहे.
कधी होणार सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात…
दरम्यान, रणबीर कपूर पुढील वर्षाच्या सुरुवातीला या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. फेब्रुवारी 2024 पासून काम सुरू करू शकतात. या चित्रपटाच्या पहिल्या भागात संपूर्ण लक्ष भगवान राम आणि सीता यांच्यावर ठेवण्यात येणार आहे.
चित्रपटाचा VFX ऑस्कर विजेती कंपनी DNEG बनवत आहे. याआधी 1 डिसेंबरला रणबीरचा अॅनिमल चित्रपटगृहात दाखल होणार आहे.