अबब! 18000 एमएएचची बॅटरी असणारा स्मार्टफोन…

स्मार्टफोन हा आजच्या लाईफ स्टाईलचा अविभाज्य घटक बनला आहे. लहानांपासून ते वयस्करांपर्यंत अशा सर्वच वयोगटातील व्यक्तींना भुरळ घालण्यात स्मार्टफोन यशस्वी ठरला असून स्मार्टफोन शिवाय आपलं आयुष्यच पूर्ण होऊ शकत नाही अशी भावना आजकालच्या पिढीमध्ये निर्माण झाली आहे.

मुव्हीज, सॉंग्स, सोशल मीडिया अशा सर्वच सोयीसुविधा स्मार्टफोनद्वारेच मिळत असल्याने दिवसरात्र स्मार्टफोनला कवटाळून बसणारे तरुण-तरुणी आपण पाहतो. एकवेळचं जेवण मिळालं नाही तरी चालेल मात्र फोनला चार्जिंग करण्याची सोय झालीच पाहिजे अशी मागणी असणारी आजकालची तरुणाई आपल्या स्मार्टफोनपासून एका क्षणाचाही विरह सहन करू शकत नाही. यामुळेच आजकाल बसस्थानके, रेल्वेस्टेशन्स आदी सार्वजनिक ठिकाणी चार्जिंगची सोय असलेल्या जागी आपला फोन चार्जिंग करण्यासाठी अनेक जण गर्दी करताना दिसतात. आपल्या फोनची चार्जिंग संपली तर आपला जगाशी संपर्कच तुटून जाईल या भीतीने स्मार्टफोन चार्जिंग करण्यासाठी गर्दी होते. मात्र चार्जिंग करण्यासाठी मोठी गर्दी असल्यामुळे अनेकांचा नंबर लागत नाही आणि त्यांच्या पदरी निराशा पडते. आता चार्जिंगच्या या समस्येवर एनरजायझर या स्मार्टफोन निर्मिती करणाऱ्या कंपनीने रामबाण सोल्युशन काढले असून त्यांनी 1800 एमएएच क्षमतेची बॅटरी असणारा स्मार्टफोन सादर केला आहे.

एनरजायझर कंपनीद्वारा लॉन्च करण्यात आलेला हा स्मार्टफोन सध्या स्मार्टफोन बाजारपेठेत ट्रेंडिंग असणारी सर्व फीचर्स तर देत असून या स्मार्टफोनमधील बॅटरी तगडी असल्याने तुम्ही चार्जिंगची फिकीर न करता दिलखुलके आपला स्मार्टफोन वापरू शकणार आहात. स्मार्टफोनचे नामकरण एनरजायझर पावर मॅक्‍स पी18के असे करण्यात आले असून तगड्या बॅटरी सोबतच या स्मार्टफोनमध्ये पॉप अप सेल्फी कॅमेरा, होलियो पी70 प्रोसेसर, 6 जीबी क्षमतेची रॅम, बेझललेस डिस्प्ले अशा अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्याने हा स्मार्टफोन मार्केटमधील इतर स्मार्टफोनना टफ कॉम्पिटिशन देताना दिसत आहे. मात्र मोठ्या क्षमतेची बॅटरी असल्याने या स्मार्टफोनची ‘जाडी’ वाढली असून यामुळे स्लिम-ट्रिम स्मार्टफोनच्या रेसमध्ये एनरजायझर पावर मॅक्‍स पिछाडीवर पडताना दिसत आहे.

– प्रशांत शिदे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.