पाचगणी – महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगडाच्या पायथ्याला कुंभरोशी गावातील २५ व २६/१ अ या वनसदृश्य क्षेत्रात शेकडो झाडांची कत्तली प्रकरणी वाई उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी सातारा जिल्ह्याचे उपवनसरक्षक अधिकारी महादेव मोहिते यांना शेकडो झाडाच्या कत्तली प्रकरणी कारवाई करण्याचे पत्र दिले आहे.
कुंभरोशी येथील वनसदृश्य क्षेत्रात शेकडो झाडाच्या कत्तली प्रकरणी आता कोण कोण मासे गळाला लागणार व कोणा कोणावर वनविभागाकडून गुन्हे दाखल होणार या बाबत महाबळेश्वर तालुक्यात चर्चा रंगू लागल्या आहेत. वनसदृश्य क्षेत्रामध्ये शेकडो झाडाच्याच्या कत्तली प्रकरणी वनविभागाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
महाबळेश्वर तालुक्याच्या तहसिलदार सुषमा चौधरी पाटील यांनी प्रकरणाची सवेदशीलता पाहता शेकडो कत्तल केलेल्या झाडाचा पंचनामा हा वनविभाच्या कारवाई करता हिमनगाचे टोक पाहिले जात आहे. महाबळेश्वरच्या तहसिलदार यांनी प्रातांना दिलेल्या पत्रानुसार मोजे कुभरोशी ता महाबळेश्वर येथील गट न २५ व २६/१ हे दोन्ही गट पुर्णता वनसदृश्य क्षेत्रात येतात त्यामुळे योग्य मोजमाप, झाडांची नावे तसेच इतर मोजमाप करणे कामी योग्य ती कार्यवाही करने उचीत होईत असे मत उपविभागीय अधिकारी वाई यांना पत्राद्वारे कळवले होते.
मौजे कुभरोशी येथील सर्वेनंबर २६/अ१ व सर्वे नंबर २५ मध्ये बाळासो भोसले व अजय भोसले यांच्या मालकी हिस्स्याच्या क्षेत्रामध्ये विनापरवाना शेकडो झांडाची कत्तल केली असल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे. जांभूळ, आईन , पिसा , गिलोरा , करंवदे काटेरी , आंबोळी , केंजळ , टिपन , करड्या,
हेळा , हिरडा , भोमा , भुरटी झाडे याप्रकारची अशी एकुन १७७ झांडाची कत्तल केली असस्याची गंभीर माहीती पंचनाम्याने समोर आली होती. दरम्यान, वनसदृश्य क्षेत्रातील बेसुमार वृक्ष तोडीवर वनविभाकडून आता कोणा-कोणावर गुन्हे दाखल होणार याकडे महाबळेश्वर वासियांचे लक्ष लागून राहिले आहे.