सिस्टेमा.बायो ने १५ दशलक्ष डॉलर चा निधी प्राप्त केल्याची घोषणा केली आहे. यात इक्विटी, कर्ज आणि नॉन-डायल्युटिव्ह भांडवलाचा समावेश आहे. कंपनीचे नाविन्यपूर्ण कचरा-ते-ऊर्जा तंत्रज्ञान आणि व्यवसाय मॉडेलची निरंतर वाढ व स्केल करण्यासाठी या निधीचा वापर केला जाईल.
सिस्टेमा.बायो शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण बायोडिजेस्टर तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि वित्तपुरवठा उपलब्ध करून देते. सिस्टेमा.बायो चे पेटंट तंत्रज्ञान जगभरातील शेतकर्यांना त्यांच्या कचर्याचे अक्षय ऊर्जा आणि जैव खतामध्ये रूपांतरित करू देते. २०२१ मध्ये, सिस्टेमा.बायो ने अनेक यशस्वी टप्पे गाठले असून १४,००० पेक्षा जास्त बायोडिजेस्टर विकल्या आणि भारतात नवीन उत्पादन कारखाना देखील सुरु केला आहे.
कावीसाफी व्हेंचर्स आणि AXA IM Alts यांनी इक्विटी गुंतवणूक केली आहे. तसेच विद्यमान गुंतवणूकदार Engie RDE, EU ElectriFI फंड, क्रोमा इम्पॅक्ट, ब्लिंक सीव्ही आणि को कॅपिटल यांनीही या फेरीत भाग घेतला आणि ट्रायडोस बँकेने अतिरिक्त कार्यरत भांडवल वित्तपुरवठा केला आहे.
या वेळी सिस्टेमा.बायो चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अलेक्स ईटन म्हणाले कि “२०२१ मध्ये आमची टीम गती आणि उत्पादनात वाढ निर्माण करण्यात सक्षम झाली आहे आणि नवीन निधीसह आम्ही उत्कृष्ट बायोगॅस उत्पादने, सेवा आणि वित्तपुरवठा मोठ्या प्रमाणात वितरित करण्यासाठी आवश्यक असलेली टीम, भागीदारी आणि संरचना तयार करणे सुरू ठेवू.” पुढे ते म्हणाले कि “शेतकऱ्यांना अधिक शाश्वत, स्वतंत्र आणि उत्पादक होण्यासाठी व पाठिंबा देण्यासाठी आम्ही तंत्रज्ञान आणि मॉडेल तयार करण्यात दहा पेक्षा अधिक वर्ष काम या वर केले आहे. शेतातील मिथेन आणि CO2 मधील लक्षणीय घट आणि जागतिक अन्न प्रणाली बळकट करणे आम्ही आता मोठ्या प्रमाणावर करू शकतो. तसेच मी घोषणा करतो की २०२५ पर्यंत १ दशलक्ष शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी स्वच्छ आणि अक्षय ऊर्जा वितरित करण्याचे आमचे लक्ष्य आहे.”
सिस्टेमा.बायो या मेक्सिको स्थित शेतकऱ्यांना सामाजिक उपक्रमाद्वारे उच्च दर्जाचे बायोगॅस निर्मिती तंत्रज्ञान प्रदान करणाऱ्या कंपनीचे भारतातील पहिले उत्पादन केंद्राचे चाकण-पुणे येथे नुकतेच सुरु झाले आहे. सिस्टेमा.बायो ची मेक्सिकोमध्ये झाली. तैनात करण्यायोग्य, मजबूत आणि प्रभावशाली बायोगॅस प्रणालीसह सिस्टेमा.बायो डायजेस्टर्स विशेषतः शेत आणि स्वच्छता प्रकल्पांच्या विस्तृत श्रेणीसाठी तयार केले आहे. आज, ३० देशांमधील २ लाख हून अधिक उत्पादनाचा वापर करणारे आहेत. कंपनी बायोगॅस तंत्रज्ञान वितरित, सेवा आणि वित्तपुरवठा यामध्ये जागतिक आघाडीवर आहे आणि मेक्सिको, कोलंबिया, केनिया आणि भारतात कार्यरत केंद्रे आहेत.