दामोह: मध्यप्रदेशातील एका पोलिस उपनिरीक्षकाने रस्त्यावरच सिंघम स्टाईलचे धाडस दाखवण्याचा प्रकार केला. उपनिरीक्षकाने सिंघम चित्रपटात अजय देवगण जसा दोन चालत्या मोटार गाड्यावर उभा राहतो तसे प्रात्यक्षिक रस्त्यावर केले. त्याबद्दल त्याला पाच हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
मनोज यादव असे या उपनिरीक्षकाचे नाव आहे. तो दामोह जिल्ह्यातील नरसिंहगड पोलिस ठाण्याचा प्रमुख आहे. यापुढे असले अघोरी प्रकार करणार नाही असे त्याच्याकडून लिहून घेण्यात आले आहे. यादव यांने हा प्रकार करताना त्याचे व्हितडओ चितत्रकरणही करून घेतले होते व मोठ्या फुशारकीने त्याने हे चित्रिकरण सोशल मीतडयावरही व्हायरल केले होते. त्याची वरीष्ठांनी गंभीर दखल घेऊन त्याच्यावर ही कारवाई केली.