नवी दिल्ली- देशातकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून लाॅकडाऊन सुरु आहे. मात्र अती खबरदारी म्हणून हा लाॅकडाऊन 3 वेळा वाढवण्यात आले होते. 18मे ही लाॅकडाऊनची शेवटची तारिख आहे. मात्र आता पून्हा लाॅकडाऊन वाढवण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
मात्र 4.0 लाॅकडाऊन हा वेगळ्या स्वरुपाता असणार आहे. त्याची नियमावली 18 मे पर्यंत जाहीर केली जाणार आहे. तसेच, 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणाही पंतप्रधान मोदींनी केली. कुटीर, गृह, लघू उद्योगासाठी पॅकेज, शेतकऱ्यांसाठी हे महत्वाचं पॅकेज, मध्यमवर्गीयांसाठीही हे पॅकेज महत्वाचं, भारतीय उद्योग जगतासाठीही हे पॅकेज, उद्यापासून ह्या पॅकेजची सविस्तर माहिती, केंद्रीय अर्थमंत्री माहिती देतील, असंही त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, आतापर्यंतच लाॅकडाऊन प्रचंड कडक स्वरुपाचं होतं. मात्र लाॅकडाऊन 4.0 ची नियमावलीमध्ये नेमकं काय असेल? कोणते मुद्दे असतील?, हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.