कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यात ब्रेक अप झाल्याची अफवा अलिकडेच पसरली होती. त्यावर कियाराने एका इंटरव्ह्यूमध्ये सूचक स्पष्टीकरण दिले आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आपला खूप चांगला जवळचा मित्र आहे, असे कियाराने म्हटले आहे. तो मित्रापेक्षाही जवळचा आहे.
त्याच्यात जिंदादिली पुरेपूर भरली आहे. तो नेहमीच आजूबाजूला असावा असे वाटते आहे, असे कियारा म्हणाली. आता तिच्या वक्तव्यावरून या दोघांमध्ये नक्की काही नाते उरले आहे की नाही याबाबत त्यांच्या फॅन्समध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कियारा आणि सिद्धार्थ हे दोघेही “शेरशाह’मध्ये एकत्र असणार आहेत. हे दोघेही प्रथमच एका सिनेमात एकत्र दिसणार आहेत. हे दोघेही बऱ्याच दिवसांपासून डेटिंग करत असल्याचे समजले आहे. त्यांना एकत्र बऱ्याच ठिकाणी बघितले गेले आहे.
मात्र आपल्या रिलेशनशीपबाबत या दोघांपैकी कोणीही उघडपणे बोललेले नाही. सिद्धार्थ खूप फोकस्ड आहे. त्याचा वाचन खूप चांगले आहे. असेही कियाराने म्हटले आहे. मग रिलेशनशीप बाबत बोलायला काय हरकत आहे?