साऊथ इंडस्ट्रीत अभिनेत्री श्रीया सरनची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. श्रीया सरन ही अजय देवगणच्या “दृश्यम’मध्येही झळकली होती. अभिनयाच्या बाबतीत तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
View this post on Instagram
गेल्या काही वर्षांपासून श्रीया स्पेनमध्ये राहात होती. तीन वर्षे स्पेनमध्ये घालवल्यानंतर श्रीया सरनने नुकताच एक बोल्ड फोटो शेअर करत “कमबॅक’ करणार असल्याचे सूतोवाच केले आहे.
View this post on Instagram
गुलाबी रंगातल्या बिकिनीतील स्वत:चा ग्लॅमरस फोटो श्रीयाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या बोल्ड लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
View this post on Instagram
तिच्या आयुष्यातील नवी अपडेट आणि नवा अवतार पाहून चाहतेदेखील खूश झाले आहेत. फोटो शेअर करत श्रीयाने लिहिले की, “आंद्रे, चला समुद्रकिनाऱ्यावर जाऊया, आरामदायक, हलकी आणि सुटसुटीत कपडे घालूया..’
View this post on Instagram
श्रीयाने तिचा रशियन बॉयफ्रेंड आंद्रे कोचीएव्हसोबत राजस्थानमध्ये लग्न केले होते. त्यानंतर दोघेही स्पेनमध्ये स्थायिक झाले होते. नुकतीच श्रीया आपल्या पतीसह मुंबईला आली आहे. अभिनेत्री चित्रपटात कमबॅक करण्यासाठी सज्ज असल्याचा अंदाज चाहत्यांकडून व्यक्त केला जात आहे.
View this post on Instagram