चिंबळी -निघोजे (ता. खेड) येथे “एक गाव एक शिवजयंती’ कार्यक्रमात श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल अँड कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी “मल्लखांब’ या खेळाचे प्रात्यक्षिक करून उपस्थितांची मने जिंकली.
स्वराज्य रक्षक संभाजी कार्यक्रम फेम अश्विनी अश्विनी महांगडे (रानु आक्का) व शिवजयंती कार्यक्रमाचे आयोजक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवाजी गवारे, सचिव विद्या गवारे, मयुरी बिरदवडे, मल्लखांब प्रशिक्षक दयानंद पाटील, विशाल राठोड, संतोष मिंढे, कर्यक्रमास उपस्थित होते.
शिवजयंतीचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सुनील गवारे, समीर गवारे, दीपक देवकर, गणेश गायकवाड व निघोजे ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे चिंबळी, कुरूळी, मोई, केळगाव, मरकळ, सोळू, धानोरे येथे ही “एक गाव एक शिवजंयती’ साजरी करण्यात.
केळगाव येथे ग्रामस्थांच्या वतीने शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थ व ग्रापंचायतीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. तर चिंबळी येथे सर्व तरूण मंडळाच्या कार्यकर्त्यानी एकत्र येऊन शिवनेरी येथून ढोलताशाच्या गजरात पायी शिवज्योत आणून ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर प्रतिमेचे पूजन करून सायंकळी ढोल-ताशाच्या गजर व फटाक्याची आतशबाजी करीत मिरवणूक काढण्यात आली.