जुन्नर तालुक्यात ऑनलाइन श्रीरामजन्मोत्सव साजरा

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथे तालुक्यातील सर्वात मोठा श्रीराम जन्मोत्सव सोहळा पार पाडला. सोहळ्याचे यंदाचे १४८ वे वर्ष होते. मागील वर्षी कोरोनाच्या भयप्रद वातावरणात श्रीराम जन्म सोहळा साजरा करण्यात आला होता.

यंदा मात्र गावातील मोजक्या पाच माणसांच्या उपस्थितीत साधेपणाने साजरा करण्यात आलेला हा सोहळा काही हौशी तरुणांमुळे संपूर्ण जिल्ह्याला बघता आला.

गावातील तरुणांनी तंत्रज्ञानाचा वापर करून पिंपळगाव तर्फे नारायणगाव हे फेसबुक पेज तयार केले. थेट प्रक्षेपणाद्वारे भाविकांना हा सोहळा घरबसल्या दाखविला गेला. सौरभ खांडगे यांनी सुरू केलेल्या या फेसबुक पेज ला प्रचंड प्रतिसाद मिळाला. दहा हजाराच्या वर भाविकांनी हा सोहळा अनुभवला.

गावातील शंकरराव वाणी, चैतन्यप्रभू वऱ्हाडी, वसंतराव वऱ्हाडी, सुरेंद्र देवकर,पद्माकर चव्हाण, राजेश खांडगे, सौरभ खांडगे, सुरेश वाणी, सचिन वाणी, पांडुरंग खांडगे राहुल गावडे यांच्या सहकार्याने आणि श्रीराम प्रासादिक भजनी मंडळाचे ह.भ.प.सखाराम आप्पा खांडगे, विजय वाणी, अनिकेत गावडे यांच्या सहकार्याने पार पडला. कोरोना महामारीचे संकट लवकरात लवकर संपावे असे साकडे ग्रामस्थांनी घातले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.