नवी दिल्ली – देशात करोना व्हायरसचे 8 हजार 488 नवीन रुग्ण आढळले आहेत, जे गेल्या 538 दिवसांतील सर्वात कमी रुग्ण आहे. शिवाय करोनामुळे 249 लोकांचा मृत्यू झाला आहे. रिकव्हरी रेट 98.31 टक्के झाला असून तो मार्च 2020 नंतर सर्वाधिक आहे. देशात सक्रिय रुग्णांची संख्या 1,18,443 आहे जी गेल्या 534 दिवसांतील सर्वात कमी आहे.
#COVID19 | India reports 8,488 new cases (lowest in 538 days), 12,510 recoveries & 249 deaths in the last 24 hours, as per Health Ministry.
Active cases stand at 1,18,443 – lowest in 534 days (account for less than 1% of total cases, currently at 0.34% – lowest since March 2020) pic.twitter.com/CRBhFddzhP
— ANI (@ANI) November 22, 2021
गेल्या 24 तासांत 12 हजार 510 रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत एकूण 3,39,34,547 लोक करोनापासून बरे झाले आहेत. ही दिलासादायक बाब जरी असली तरी गेल्या काही दिवसांपासून देशात करोना रुग्णांची संख्या कधी कमी तर कधी जास्त होताना दिसून येत आहे.