सोमेश्वरनगर: पुणे जिल्हातील बारामती तालुक्यात निरा बारामती राज्य महामार्गावर करंजेपुल पासून चार कि.मी अंतरावर जग प्रसिध्द श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर आहे. सौराष्ट्रातील प्रती सोमनाथ म्हणून प्रसिद्ध असलेले श्री क्षेत्र सोमेश्वर मंदीर येथे दरवर्षी श्रावनात महिनाभर यात्रा भरते.
गुरुवारी दि १.पासून श्रावण महिना चालू झाला असून दि ५ सोमवार पहिलाच सोमवार असने आणि नागपंचमी सुट्टी असल्याने जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातून आलेल्या भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. रविवारी मध्य रात्री १२ वाजता सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप त्यांच्या पत्नी रोहिणी जगताप यांच्या हस्ते पुरोहित ऋषिकेश घोलप, मुकेश भांडवलकर व पुजारी माधव मोकाशी यांच्या हस्ते शिव मंत्रमुग्ध पूजा पार पडली.
यावेळी राष्ट्रवादीचे बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, बारामती वारकरी परिषदचे अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, करंजे मा तंटामुक्ती अध्यक्ष संताजी गायकवाड, बाळासो भांडवलकर पंचक्रोशीतील ग्रामस्थ मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.
सोमेश्वर (करंजे )मंदिर परिसर मिठाईवाले, वेगवेळ्या प्रकारचे पाळणे,खेळणी,गृहउपयोगी वस्तू खरेदी दुकाने ,हॉटेल यामुळे परिसर आत्ता महिनाभर गजबणार आहे.
सकाळपासूनच उपवास खिचडी प्रसाद धान्याकुमार भोसले,डॉ मनोहर कदम,घनश्याम पडवळ, यांच्या वतीने येणाऱ्या शिवभक्त भाविकांसाठी दिवसभर खिचडी वाटप करण्यात आली. संतोष भगवान अलगुडे व शिवशंभू पवार यांच्या वतीने संध्याकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
प्राथमीक आरोग्य सेवा होळ यांच्या वतीने डॉ. मनोज खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांसाठी मोफत औषधोपचारांंची सोय करण्यात आली, ,एस टी महामंडळाद्वारे अधिक च्या जादा गाड्या ,भावीकांसाठी भक्त निवास ,प्रशस्त वाहनतळ,पिण्यासाठी पाणी आदी सुविधा भावीकाना करण्यात आली,कोणताही अनुचित प्रकार घडु नये.यासाठी १४सी बसविण्यात आले आहे.
वडगाव निंंबाळकर प्रभारी पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली, ४० पोलीस कर्मचारी व महिला यांनी मंदिर परिसरात कोणताही अघटित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता. अशी माहिती सोमेश्वर देवस्थान समीतीचे अध्यक्ष विनोद भांडवलकर, सचीव सुनील भांडवलकर, विश्वस्त ॲड गणेश आळंदीकर यांनी दिली.
देवस्थान विश्वस्त अँँडो गणेश आळंदीकर… मंदिर परिसरातील दर्शनासाठी आलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांना कर आकारला जाणार नाही. ही मोफत सेवा मागील वर्षांपासून चालू केली आहे.