नवीन वर्षाचे आगमन होताच बॉलिवूडमध्ये लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. आमिर खानच्या मुलीपासून ते धर्मेंद्रच्या नातवापर्यंत सर्वांचे लग्न झाले. गेल्या वर्षीच कियारा अडवाणी आणि अथिया शेट्टीने लगीन गाठ बांधली.
बॉलिवूडमध्ये ‘आशिकी गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रद्धा कपूरनेही लग्न करण्याचा निर्णय चर्चा रंगली आहे. मात्र, स्वत: श्रद्धाने तिच्या लग्नाबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
श्रद्धा कपूरने इन्स्टाग्रामवर तिची लेटेस्ट पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये ती सुंदर गुलाबी सूटमध्ये खूपच क्यूट दिसत आहे. अभिनेत्रीने तिचे काही फोटो शेअर केले आहे, ज्यात ती खूपच क्यूट दिसत आहे. ही पोस्ट शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी चांगली दिसत आहे, मी लग्न करावे का?’ अभिनेत्रीचे हे कॅप्शन पाहता ती तिच्या आयुष्यात पुढे जाण्याचा विचार करत आहे.
इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूरला लाइमलाइटपासून दूर राहणे आवडते, परंतु अभिनेत्रीच्या चाहत्यांची कमतरता नाही. बॉलीवूडमध्ये तिची फॅन फॉलोइंग सर्वाधिक आहे आणि लोक तिच्या लग्नाच्या चर्चेवर आता प्रतिक्रिया देत आहे. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले की, ‘लग्नासाठी पंडित पाहिजे.’ दुसऱ्या यूजरने कमेंट करत ‘साधेपणा’ असे लिहिले तर एकाने लिहिले की, ‘या फोटोमुळे ट्रॅफिक जाम झाला आहे.’
श्रद्धा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची ‘तू झुठी मैं मकर’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसला होता. दोघांची केमिस्ट्री लोकांना खूप आवडली. आता लवकरच ही अभिनेत्री तिच्या सुपरहिट चित्रपट स्त्री २ च्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. श्रद्धा तिच्या साधेपणामुळे लोकांना प्रभावित करते आणि लोक तिच्या स्टाइलचे वेडे आहेत.