श्रीनगर – काश्मीरात एका पीडीपी नेत्याच्या घरावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात त्या नेत्याचा व्यक्तीगत सुरक्षा अधिकारी मारला गेला आहे. परवैझ भट असे या पीडीपी नेत्याचे नाव आहे. ते मात्र सुुदैवाने या हल्ल्यातून वाचले आहेत.
या हल्ल्याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, हे दहशतवादी नेहमीच्या काश्मीरी नागरीकांच्या पेहरावात आले होते. त्यांच्याकडे एके रायफली होत्या. त्या त्यांनी आपल्या पेहरावात लपवल्या होत्या. आपल्या घराजवळ येऊन त्यांनी अचानक गोळीबार सुरू केला.
आपल्या सुरक्षा रक्षकाने त्यांच्यावर प्रतिगोळीबार करून त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. आपण राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आल्यापासून आपल्यावर झालेला हा तिसरा हल्ला होता असे त्यांनी सांगितले.
परवैझ भट हे पूर्वाश्रमीचे दहशतवादी आहेत. दहशतवादी कारवाया सोडून ते राजकारणात आले आहेत. ते म्हणाले की सरकारने आपल्या सुरक्षा व्यवस्थेत घट केल्याने आपल्यावर अशा प्रकारचे हल्ले सतत होत आहेत.