सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणात जामीन

एस.टी. चालकाला कानशिलात लगावून सरकारी कामात अडथळा

पुणे, दि. 14 – कॅबिनमध्ये घुसून एस.टी.चालकाला मारहाण करत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणात छोट्या टेम्पो चालकाला 15 हजार रुपयांचा जामीन सत्र न्यायाधीश एस.एस.गोसावी यांनी मंजुर केला आहे.

नीलेश राजाराम माने (वय 23, रा. जवळा, ता. पारनेर, जि. नगर) असे त्याचे नाव आहे. त्याने ऍड. भालचंद्र पवार, ऍड. अक्षय रतनगिरी यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. 18 नोव्हेंबर रोजी शिरूर येथील एस.टी. स्थानक येथे ही घटना घडली. 42 वर्षीय एस.टी. चालकाने याबाबत फिर्याद दिली आहे. माने याच्या छोट्या टेम्पोला एस.टी. घासली होती.

याचा राग मनात धरून चालकाला कानशिलात लगावून सरकारी कामात अडथळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणत माने याला शिरूर पोलिसांनी अटक केली आहे. त्याने न्यायालयीन कोठडीत असताना जामिनासाठी अर्ज केला. साक्षीदारांवर दबाव न आणणे, पुराव्यामध्ये ढवळाढवळ न करणे आणि दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याच्या अटीवर हा निकाल देण्यात आला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.