पुणे : बहिणीच्या लग्नाला जाण्याबाबत विचारणा केल्यानंतर डॉक्टर पतीने डॉक्टर पत्नीचे चाकूने केस कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात घडली.
या प्रकरणी डॉक्टर पतीला विश्रांतवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या डॉ. रवी दिगंबर धादवड (रा. तिरूपती रेसीडेन्सी, मुंजोबा वस्ती, धानोरी, विश्रांतवाडी) याला अटक केली आहे. बहिणीच्या लग्नाला जाण्याबाबत विचारणा केल्यानंतर डॉक्टर पतीने डॉक्टर पत्नीचे चाकूने केस कापल्याची घटना घडली. याबाबत डॉ. पल्लवी रवी धादवड (37) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.