राजगुरूनगर-खेड तालुक्यात 24 तासांत 209 व्यक्ती करोना पॉझिटिव्ह साडपल्या असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
तालुक्यात आजपर्यंत 29447 नागरिकांना कोविड 19चे लसीकरण झाले आहे. तर 3 मार्चपासून आतापर्यंत सुपर स्प्रेडर 13 टप्प्यात 9513 नागरिकांच्या अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या. त्यापैकी 952 नागरिक करोना पॉझिटिव्ह सापडले आहेत.
मागील 24 तासात चाकण नगरपरिषद हद्दीत 36, आळंदी 15, राजगुरुनगर 28 यांसह ग्रामीण भागातील खराबवाडी 12, चऱ्होली खुर्द 11, कुरूळी, नाणेकरवाडी प्रत्येकी 8, भोसे 6, शेलपिंपळगाव 5, सावरदरी, आंबेठाण, सातकरस्थळ, वरुडे, दावडी प्रत्येकी 4, निघोजे, कोयाळी, राक्षेवाडी प्रत्येकी 3, चांडोली, दोंदे, कडूस, म्हाळुंगे, चांदुस, रौंधळवाडी, काळेचीवाडी, मांजरेवाडी, पाडळी, टाकळकरवाडी, बहुळ, काळुस,
मरकळ, रासे, सोळु येथे प्रत्येकी 2, तर पडाळवाडी, रोहकल, सांडभोरवाडी, वाकी बुद्रुक चास, कनेरसर, खरपुडी बुद्रुक, कोहिणकरवाडी, गारगोटवाडी , बिरदवडी, वासुली, भांबुरवाडी, होलेवाडी, कडाचीवाडी, मेदनकरवाडी येथे प्रत्येकी 1 व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्या आहेत. तालुक्यात एकूण 13434 पैकी 12357 व्यक्ती उपचारानंतर बरे झाले आहेत. 209व्यक्तींचा आतापर्यंत मृत्यू झाला असून, 870 जण कोविड केअर सेंटर व खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत.