नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात सध्या 45 लाख 50 हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आहेत. तर देशात आतापर्यंत 76 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अशातच आता एक आश्चर्यचकीत करणारी माहिती समोर आली आहे.आयसीएमआर(ICMR) ने काही दिवसांपूर्वी एक सर्व्हे केला होता. यामध्ये मे महिन्याच्या सुरुवातीलाच 64 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली होती, अशी माहिती या सर्व्हेमधून समोर आली आहे.
आयसीएमआर (ICMR) तर्फे काही दिवसांपूर्वी नॅशनल सीरोलॉजिकल सर्व्हे करण्यात आला होता. त्याचे निष्कर्ष आता समोर आले आहेत. यामधून एक आश्चर्यचकीत करणारा खुलासा करण्यात आला आहे. सर्व्हेनुसार, मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत 64 लाख (64,68,388) लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याची आकडेवारी टक्केवारीमध्ये पाहायची झाली तर 0.73 टक्के लोकं कोरोनाग्रस्त असल्याचे या सर्व्हेमधून निष्पन्न झाले आहे.
सीरो सर्व्हेनुसार, आरटी-पीसीआर टेस्टमार्फत एक रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न होत होते. तर मे महिन्या दरम्यान, 82 ते 130 कोरोना बाधितांचे रुग्ण समोर येत होते. सीरो सर्व्हेनुसार, ज्या ठिकाणी कोरोना संसर्गाची प्रकरणे समोर आली नाहीत. कारण त्यावेळी त्यांच्या परिसरात टेस्टिंग फॅसिलिटी अपलब्ध नव्हत्या. त्यामुळे तिथे कोरोनाच्या चाचणी मोठ्या प्रमाणात झाल्या नाहीत. तसेच हा सर्व्हे देशातील लॉकडाऊन दरम्यान करण्यात आला होता.
आयसीएमआर (ICMR) चा हा सर्व्हे 11 मेपासून 4 जूनदरम्यान करण्यात आला आणि 28,000 लोकांना यामध्ये सहभागी करण्यात आले होते. त्यांच्या ब्लड सॅम्पल्समध्ये अॅन्टीबॉडीज आढळून आल्या. या सर्व्हेमध्ये 18 वर्षांवरील लोकांचे मोठ्या प्रमाणावर सॅम्पल्स घेण्यात आले होते. सर्व्हेचा सॅम्पल साइज 28,000 होते.
देशातील 21 राज्यांतील 70 जिल्ह्यांमध्ये जाऊन 700 गावांत वॉर्डमध्ये हा नॅशनल सीरोलॉजिकल सर्व्हे करण्यात आला होता. यामध्ये 181 म्हणजेच, 25.9 टक्के शहरी विभाग होते. 18 ते 45 वर्ष वयोगटातील लोकांमध्ये 43.3 लोक पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. तर 46-60 वयोगटातील ग्रुपमध्ये 39.5 टक्के लोक पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. वयवर्षे 60 वर्षांच्या वरील लोकांमध्ये 17.2 लोक पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले.