पुणे – झी मराठी वाहिनीवरील राजकारणावर बेतलेली “कारभारी लयभारी’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. मात्र, अश्यातच मालिकेतील एका नवोदित कलाकाराला काही अज्ञातांकडून जबर मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
कारभारी लयभारी मालिकेतील गंगा म्हणजेच ‘प्रणित हाटे’ या कलाकाराला भर रस्त्यात मारहाण करण्यात आली आहे. आपल्याला मारहाण झाल्याची संपूर्ण घटना गंगाने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. शेअर केल्या या व्हिडिओमध्ये ती अतिशय घाबरलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहे. सध्या तिचा हा सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये ती म्हणते कि, “मी एका बस स्टॉपवर बसची वाट पाहत उभी होती. अचानक काही मुलांनी मला विनाकारण मारण्यास सुरुवात केली. मी काय करू आणि कोणाची मदत घेऊ, ते मला प्लीज सांगा”, असं रडत गंगा या व्हिडीओत सांगतेय. घडलेल्या प्रकरणाला घाबरून गंगाने तिथून पळ काढला आणि ऑटोमधून ती घराकडे निघाली. ऑटोमध्ये बसल्यानंतर तिने हा व्हिडीओ शूट केला आहे. आता पुढे काय करावं याची विचारणा ती नेटकऱ्यांकडे करत आहे. गंगाला कोणी आणि का मारहाण केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
View this post on Instagram
डान्सिंग क्वीन या शोमधून गंगा हा चेहरा महाराष्ट्रासमोर आला. ट्रान्सजेंडर असलेल्या गंगाचा स्वत:च अस्त्तित्व सिद्ध करण्यापासून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यापर्यंतचा प्रवास अत्यंत बिकट आहे. झी युवाच्या मंचावर गंगाला पहिल्यांदा ओळख मिळाली आणि त्यानंतर कारभारी लयभारी मालिकेत ती कलाकार म्हणून वेगळ्या भूमिकेत लोकांसमोर आली आहे. आपल्या अभिनय कौशल्यावर तिने ही भूमिका मिळवली असून अत्यंत समजूतदारपणे ती तिच्या भूमिकेला न्याय देत आहे.
View this post on Instagram