एकट्या मंचरमध्ये महासर्वेक्षणात 72 बाधित
मंचर (पुणे)- आंबेगाव तालुक्यात करोनाने कहरच केला आहे. गुरूवारी एकाच दिवसात करोनाने आठ बळी घेतले. आज तालुक्यात 172 रुग्ण आढळून आहे. यात मंचरमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सर्वाधिक 72 बाधित आढळले.
इतर गावांत अवसरी 9, पेठ, घोडेगावात प्रत्येकी 7, जारकरवाडी, मेंगडेवाडीत प्रत्येकी 6, महाळुंगे पडवळ, चांडोली खुर्द प्रत्येकी 5, नारोडी, वळती, पारगाव तर्फे अवसरी, निघोटवाडीत प्रत्येकी 4, कळंब, काहेवाडी-दरेकरवाडी प्रत्येकी 3, खडकी, लौकी, गंगापूर बु., अवसरी बु., चांडोली बु., शिंगवे, शेवाळवाडीत प्रत्येकी 2, तर साल, काळवाडी/कोटमदरा, सुपेघर, चास, शिनोली, ओमोंडी, नागापूर, वडगावपीर, शिरदाळे, जाधववाडी, जवळे, खडकवाडी, गावडेवाडी, टाकेवाडी, पिंपळगाव तर्फे महाळुंगे, निरगुडसर, भावडी व भराडी प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. तालुक्याची रुग्णसंख्या 2373 इतकी झाली आहे.