- हिंजवडीतील करोना सेंटरमध्ये 12 पॉझिटिव्ह कर्मचारी उपचारार्थ दाखल
देहूरोड – देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डातील 13 कर्मचारी करोना बाधित निष्पन्न झालेल्या पैकी 12 कर्मचाऱ्यांना हिंजवडी येथील विप्रो करोना सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल केले आहे.
मागील पंधरावड्यात 16 फेब्रुवारी रोजी राजस्थान येथे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांचा विवाह होता. बोर्डाच्या काही सदस्यांसह काही कर्मचारी विवाह सोहळ्यास गेले होते. सोहळ्याहून परतल्यानंतर कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (दि. 26) करोना टेस्ट केली. शनिवारी या कर्मचाऱ्यांचा करोना अहवाल “पॉझिटिव्ह’ आला. त्यामुळे बोर्डाच्या 12 कर्मचाऱ्यांना हिंजवडी येथे दाखल केले आहे.
एकावेळी एवढे कर्मचारी “पॉझिटिव्ह’ झाल्याने बोर्डातील प्रत्येक विभागात सध्या दोन ते तीन कर्मचारी प्रत्येक विभागात कार्यरत आहेत.