मोदींनी लस घेताना नर्सला विचारलं, “माझ्यासाठी जनावरांची सुई वापरणार आहात का ?”

नवी दिल्ली – देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करोनाची लस घेतली आहे. ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण तिसऱ्या टप्प्यात करण्यात येणार आहे. या टप्प्याची सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सकाळी सातच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रुग्णालयामध्ये लसीची पहिला डोस घेतला. यासंदर्भातील फोटो मोदींनीच ट्विट केला आहे.

दरम्यान, शेअर केलेल्या या फोटोमध्ये मोदींसोबत दोन नर्सही दिसत आहेत. पंतप्रधानांना लस देणाऱ्या या महिलेचं नाव ‘पी. निवेदा असं आहे. निवेदा या मूळच्या पुद्दुचेरीच्या आहेत. तसेच दुसऱ्या नर्सचे नाव रोसामा अनिल असं असून त्या केरळच्या आहेत. मात्र, मोदींना लस देण्याऱ्या निवेदा यांनी आपला अनुभव व्यक्त केला आहे.

मोदींना लस देत असताना मोदींनी नर्सेला असं काही म्हटलं की नर्सेसलाही हसू आवरले नाही. राजकारणी जाड कातडीचे असतात, त्यामुळे तुम्ही मला लस देण्यासाठी वेगळी सुई वापरणार का ? अशी विचारणा मोदींनी करत उपस्थितांमध्ये हशा पिकवला. राजकारण्यांवर नेहमीच टीका होत असते की मागणी करुनही राजकारणी, नेते निर्णय घेत नाहीत. ते ‘गेंड्याच्या कातड्याचे’ असतात. हाच धागा पकडत मोदींनी नर्सेला हसवले.

दरम्यान मोदी लस घेण्यासाठी रुग्णालयात येण्याआधीच नर्सेस काहीशा तणावात होत्या. हे मोदींच्या लक्षात आलं. त्यांनी तणाव कमी करण्याच्या उद्देशाने आरोग्य कर्मचाऱ्यांशी बोलायला सुरुवात केली. तसेच नर्सला हसवण्यासाठी त्यांनी राजकारण्यांवरच विनोद केला. “राजकारण्यांची कातडी जाड असल्याने जनावरांची सुई तर वापरणार नाही ना?” असा प्रश्न मोदींनी विचारला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.