धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या…

मुंबई – ‘धनंजय मुंडे यांनी स्वत:हून राजीनामा द्यायला हवा’, असं विधान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. संजय राठोड प्रकरणी भूमिका मांडल्यानंतर पंकजा यांना सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी हे विधान केलं आहे.

‘भाजपची तर राजीनाम्याची मागणीच आहे. पण जेव्हा तुमच्याकडे बोट दाखवलं जातं, तेव्हा नैसग्रिक प्रतिक्रिया ही स्वत:हून दूर होणं ही असते. मात्र, सध्या जो राजकारणात पायंडा पडत आहे, तो चुकीचा आहे’, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

संजय राठोड यांच्या राजीनाम्यासंदर्भात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, राठोड यांनी राजीनामा दिला आहे की पक्षाने तो मागितला हा अंतर्गत विषय आहे, पण त्यांनी निश्चितच एक पाऊल पुढे टाकलं आहे.

काय आहे धनंजय मुंडे यांचं प्रकरण ?

धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. मात्र, हे आरोप ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने केले असल्याचं सांगत मुंडे यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. तसंच आरोप करणाऱ्या महिलेच्या बहिणीशी आपले परस्पर सहमतीने संबंध होते. या संबंधातून दोन मुलं झाली असून त्यांचा सांभाळही आपण करत असल्याचा खुलासा मुंडे यांनी केला आहे.

धनंजय मुंडे यांच्या या खुलाशानंतर भाजपनं त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. भाजप नेते किरीट सोमैय्या, चंद्रकांत पाटील, चित्रा वाघ यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र पंकजा मुंडे यांनी याप्रकरणी कोणतंही भाष्य केलं नव्हतं.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.