नवीदिल्ली – पाकिस्तानचा खेळाडू शोएब मलिका आणि सानिया मिर्झा सध्या चांगलेच चर्चेत आहेत. दोघेही लवकरच विभक्त होणार असल्याच्या जोरदार चर्चा सध्या माध्यमांमध्ये सुरु आहेत.यातच आता शोएबचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात तो अक्षरशः रडताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ एका लाईव्ह टीव्ही प्रोग्राममधील आहे.
यावेळी व्हिडिओमध्ये पाकिस्तानचे काही खेळाडू दिसत आहेत. ज्यामध्ये वकार युनूस, वसीम अक्रम, मिसबाह-उल-हक आणि शोएब मलिक यांचा समावेश आहे. इंग्लंड पाकिस्तान टी २० फायनल मॅचपूर्वी एका टीव्ही चॅनलवर हा शो सुरु होता. त्या दरम्यानचा हा व्हैडीओ आहे.यावेळी शोएबला २००७ मधील टी २० विश्वकप आणि २००९ मधील विश्वकपबाबत प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी तो भावून होऊन रडल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते.
शोएब मलिकला यावेळी दोन्हही विश्वचषकाबाबत विचारण्यात आले होते. यावेळी २००९ बाबत तो बोलताना म्हणाला,ज्यावेळी आम्ही फायनल जिंकलो त्यावेळी युनूस खानने मला बोलावलं आणि ट्रॉफी घेण्यास सांगितलं ते माझ्यासाठी खूप खास होत. असं म्हणत शोएब यावेळी इमोशनल झाला आणि रडू लागला.
Shoaib Malik got emotional and had a tear in his eye, recalling Pakistan’s 2009 #T20WorldCup title win. This is what it means to the players ♥️pic.twitter.com/GuqwaESLcj
— Farid Khan (@_FaridKhan) November 12, 2022