मुंबई : राज्यातील सत्तानाट्याचा संघर्ष अधिकच तीव्र होत चालला आहे. सध्या महाविकास आघाडी सरकार अस्थिर बनले असताना उद्याच 30 जून रोजी बहुमत सिद्ध करा असे आव्हान राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना दिले. त्यांच्या निर्देशाला शिवसेनेचे मुख्य व्हीप सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आज संध्याकाळी ५ वाजता यावर सुप्रीम कोर्टाकडून सुनावणी होणार आहे.
Supreme Court agrees to hear at 5 pm plea of Shiv Sena chief whip Sunil Prabhu challenging Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari's direction to Chief Minister Uddhav Thackeray to prove his majority support on the floor of the House on June 30.#MaharashtraPolitcalCrisis pic.twitter.com/3PqhbmDWZ2
— ANI (@ANI) June 29, 2022
शिवसेनेची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी आज तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करणाऱ्या शिवसेनेचे मुख्य व्हीप सुनील प्रभू यांच्या याचिकेचा सर्वोच्च न्यायालयासमोर उल्लेख केला यावेळी त्यांनी अशा पद्धतीने “फ्लोर टेस्ट घेणे बेकायदेशीर आहे.” असे म्हंटले.
संध्याकाळी ५ वाजताची वेळ याकरिता देण्यात आली आहे. त्यामुळे उद्याच बहुमत चाचणी होणार का ? याबाबत आज सायंकाळी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. शिवसेनेसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा मनाला जात आहे.