लोणावळा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात लोणावळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंगळवारी (दि. 24) लोणावळा शहर व मावळ तालुका शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी राणे यांच्या फ्लेक्सला जोडे मारत पोस्टर जाळले. त्यानंतर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात शहरप्रमुख बाळासाहेब फाटक यांनी निवेदन सादर केले.
या आंदोलना दरम्यान शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या विरोधात आगपाखड करत, घोषणाबाजी केली. तसेच मुख्यमंत्री या संविधानिक पदावर असलेले उद्धव ठाकरे यांच्याविषयी असभ्य भाषा वापरणारे राणे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.
या आंदोलनात शिवसेनेचे मावळ तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, महिला जिल्हा समन्वयक शादान चौधरी, लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, मावळ उपतालुका प्रमुख गबळू ठोंबरे, सुरेश गायकवाड, अंकुश देशमुख, नगरसेविका सिंधू परदेशी, युवासेना तालुका अध्यक्ष शाम सुतार, शहर महिला उपसंघटक मनीषा भांगरे, विशाल हुलावळे, नितीन देशमुख, उपसंघटक संजय भोईर, जयवंत दळवी, युवासेना अध्यक्ष तानाजी सूर्यवंशी, कैलास पडवळ, काळुराम हुलावळे, भगवान देशमुख, काशिनाथ देशमुख, सरपंच सुनील येवले, सुभाष खोले, बाळासाहेब येवले, विनायक हुलावळे, ओमकार फाटक यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.