शिरूर : तालुक्यात नागरिक बेशिस्त मात्र मद्यपीं शिस्तीतच !

शिरूर : तालुक्‍यात आज सकाळपासूनच नागरिकांनी बेशिस्तीचे दर्शन घडवले असताना येथील तळीराम मात्र शिस्तीत होते. त्यामुळे शिरूर शहरात नागरिक बेशिस्तीत तर तळीराम शिस्तीत अशी म्हणण्याची वेळ आली आहे. याची चर्चा आज शिरूर शहरामध्ये सुरू होती. शिरूरच्या सर्व व्हाट्सअप, फेसबुक ग्रुप वर , टिकटॉक वर शिरूरच्या तळीरामांच्या लांब लागलेल्या लाईनचे व्हिडिओ पोस्ट होत होते.


तळीरामांच्या या सोशल डिस्टन्स गर्दीला पाहण्यासाठी शहरातील अनेक नागरिक येत होते. कोरोना व्हायरसमुळे गेल्या दीड महिन्यापासून दारूची दुकाने बंद होती. त्यामुळे तळीरामांची मोठी तारांबळ होत होती.

त्यात आज दारूची दुकाने सुरू होणार असल्याने तळीरामांनी दुकानासमोर केली गर्दी होती.शिरूर शहरात एकमेव वाईन शॉपचे दुकान असून येथे आज दुकान उघडल्यापासून तळीरामांची एकच गर्दी झाली. मात्र, तळीरामांनी यावेळी शिस्तीचे आणि सोशल डिस्टन्सचे कडेकोट पालन केले. त्यामुळे शिरूर शहरात नागरिकांच्या बेशिस्तीचे तर तळीरामांची शिस्तीचे दर्शन आज शहरातील नागरिकांना झाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.